Surprise Me!

54 गावांसाठी बोंडारवाडी धरण होणं काळाची गरज - भारत पाटणकर | SakalMedia

2021-10-25 608 Dailymotion

54 गावांसाठी बोंडारवाडी धरण होणं काळाची गरज - भारत पाटणकर | SakalMedia<br />केळघर : जावळी तालुक्यात सर्वाधिक पाऊस पडतो. हा दुर्गम व डोंगराळ तालुका आहे. मात्र, येथे पुरेसे पाणी नसल्याने युवकांना रोजगारासाठी पुणे, मुंबईचा रस्ता धरावा लागत आहे. देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्ष होत असली तरी सामान्य जनतेला पिण्याचे पाणी मिळू शकत नाही, ही शोकांतिका आहे. त्यामुळे अर्थार्जनासाठी व येथील शेतकऱ्यांना हक्काचे पाणी देण्यासाठी ५४ गावांसाठी बोंडारवाडी धरण होणे काळाची गरज असून श्रमिक मुक्ती दल धरण कृती समितीच्या साहाय्याने लढा उभा करणार असून ५४ गावांनी संघटित राहून या लढ्यासाठी पुढे यावे, असे आवाहन श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर यांनी केले. आज मेढ्यातील कलश मंगल कार्यालयात बोंडारवाडी धरण कृती समितीच्या वतीने आयोजित ५४ गावांतील ग्रामस्थांच्या मेळाव्यात ते बोलत होते. (व्हिडिओ : संदीप गाडवे)<br />#BharatPatankar #Satara #Bondarwadidam

Buy Now on CodeCanyon